10
येशु सुटपत्रबद्दल शिकाडस
(मत्तय १९:१-१२; लूक १६:१८)
1 मंग येशु तठेन निंघीसन यहूदीयाना प्रदेशमातीन यार्देन नदीना पलीकडे वना अनी तठे लोकसनी गर्दी एकत्र व्हईन परत त्यानाकडे वनी, अनी त्यानी पध्दतमा तो त्यासले शिकाडू लागना.
2 तवय काही परूशीसनी त्याले शब्दसमा पकडाकरता तठे ईसन त्याले प्रश्न ईचारा की, “नवरानी बायकोले सुटपत्र देवानं, नियमप्रमाणे हाई योग्य शे का?”
3 येशुनी त्यासले उत्तर दिधं की, “मोशेनी तुमले काय आज्ञा देयल शे?”
4 त्या बोलणात, “नवरानी बायकोले सुटपत्र दिसन सोडानं, अशी आज्ञा मोशेनी देयल शे.”
5 पण येशुनी त्यासले सांगं, “त्यानी हाई आज्ञा देवानं कारण मी तुमले सांगस, तुमनं निर्दय मनमुये मोशेनी तुमले हाई आज्ञा दिधी,
6 पण जसं वचनमा लिखेल शे, पृथ्वीनी निर्मिती पाईनच देवनी पुरूष अनी स्त्रीले बनाडं.
7 या कारणमुयेच पुरूष त्याना माय बापले सोडिसन त्यानी बायकोसंगेच राही,
8 पुढे त्या दोन नहीत तर एक शरीर शेतस.
9 यामुये देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडानं नही.”
10 त्या परत घर वनात तवय येशुना शिष्यसनी त्याच विषयबद्दल परत ईचारं.
11 तवय येशुनी त्यासले सांगं, “जो कोणी आपली बायकोले सुटपत्र दिसन दुसरीसंगे लगीन करस तर तो आपली बायकोसंगे व्यभिचार करस.
12 अनी जर बायको आपला पहिला नवराले सुटपत्र दिसन दुसरासंगे लगीन करस तर ती तिना आपला नवरासंगे व्यभिचार करस.”
येशु धाकला पोऱ्यासले आशिर्वाद देस
(मत्तय १९:१३-१५; लूक १८:१५-१७)
13 येशुनी पोऱ्यासले आशिर्वाद देवाले पाहिजे म्हणीन काही लोके आपला पोऱ्यासले येशुकडे लई वनात पण शिष्यसनी त्यासले दताडं.
14 ते दखीसन येशुले भलतं वाईट वाटनं अनी तो शिष्यसले बोलना, “धाकलासले मनाजवळ येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण देवनं राज्य धाकलासना मायकच शे.
15 मी तुमले सत्य सांगस, जो कोणी धाकलासना मायक व्हईसन देवना राज्यना स्विकार कराव नही त्याना त्यामा प्रवेश व्हवाव नही.”
16 तवय त्यानी धाकलासले कवटाळीन अनी त्यासवर हात ठेईन त्यासले आशिर्वाद दिधा.
श्रीमंत तरूण
(मत्तय १९:१६-३०; लूक १८:१८-३०)
17 मंग येशु निंघीन वाटले लागना इतलामा एक पोऱ्या पयत वना अनी त्यानापुढे गुडघा टेकीसन त्याले ईचारू लागना, “चांगला गुरजी, सार्वकालिक जिवन मिळाकरता मी काय करू?”
18 येशुनी त्याले सांगं, “माले चांगला का बरं म्हणस? देवना शिवाय कोणीच चांगला नही.
19 तुले तर देवन्या आज्ञा माहित शेतस; ‘मनुष्यहत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसाडु नको,’ ‘आपला बाप अनी माय यासना मान राख.’ ”
20 त्यानी उत्तर दिधं, “गुरजी, मी तरूणपणपाईन या सर्व आज्ञा पाळेल शेतस.”
21 येशुना मनमा त्यानाबद्दल प्रेम निर्माण व्हयनं त्यानी त्यानाकडे दखीन सांगं, “तुनामा एक कमी शे. जा, तुनं सर्वकाही ईकी टाक अनी येल पैसा गरीबसमा वाटी दे म्हणजे तुले स्वर्गमा धन भेटी; अनी मंग मनामांगे ये.”
22 पण हाई ऐकीसन त्यानं तोंड उतरी गयं अनी तो नाराज व्हईन निंघी गया कारण तो भलता श्रीमंत व्हता.
23 तवय येशुनी चारीबाजु दखीसन आपला शिष्यसले सांगं, “श्रीमंतसले देवना राज्यमा प्रवेश करनं कितलं कठीण शे!”
24 हाई ऐकीसन शिष्यसले आश्चर्य वाटणं, येशुनी त्यासले परत सांगं, “मना पोऱ्यासवन, देवना राज्यमा प्रवेश करनं कितलं कठीण शे!
25 श्रीमंत माणुसले देवना राज्यमा प्रवेश करानं यानापेक्षा उंटले सुईना नाकमातीन जाणं सोपं शे.”
26 शिष्य भलताच आश्चर्यचकीत व्हयनात अनी ईचारू लागनात, “तर मंग तारण व्हई तरी कोणं?”
27 येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, “मनुष्यकरता हाई अशक्य शे, पण देवकरता नही; कारण देवले सर्वकाही शक्य शे.”
28 पेत्र त्याले बोलना, “तुमना शिष्य व्हवाकरता आम्हीन आमनं बठं काही सोडी देयल शे.”
29 यावर येशुनी उत्तर दिधं, “मी तुमले खरंखरं सांगस की, ज्यानी मनाकरता अनी सुवार्ता प्रचार करता घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावरसले सोडी देयल शे.
30 त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी.
31 पण तरी बराच जणससंगे अस व्हई की, ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन अनी ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन.”
तिसरांदाव येशु त्याना मृत्युबद्दल बोलस
(मत्तय २०:१७-१९; लूक १८:३१-३४)
32 मंग येशु अनी त्याना शिष्य यरूशलेमले जाई राहींतात, अनी येशु शिष्यसना पुढे चाली राहिंता, त्या घाबरेल व्हतात; अनी ज्या मांगे चाली राहींतात त्यासना मनमा भिती भराई जायेल व्हती. तवय परत येशुनी बारा शिष्यसले जोडे बलाईन जे त्यानासंगे घडाव शे, ते.
33 त्यासले तो सांगु लागना, “दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत मनुष्यना पोऱ्याले प्रमुख याजक अनी शास्त्री ह्यासले सोपी देतीन. त्या त्याले मरणदंडकरता दोषी ठराईसन गैरयहूदीसना हवाले करतीन,
34 त्या त्यानी थट्टा करतीन, त्यानावर थुंकतीन, त्याले फटका मारतीन अनं त्याले मारी टाकतीन; अनी तीन दिनमा तो परत जिवत व्हई.”
याकोब अनी योहाननी ईनंती
(मत्तय २०:२०-२८)
35 जब्दीना पोऱ्या याकोब अनी योहान येशुजोडे ईसन बोलणात, “गुरजी, जे काही आम्हीन तुमनाकडे मांगसूत ते तुम्हीन आमनाकरता करा अशी आमनी ईच्छा शे.”
36 येशुनी त्यासले ईचारं, “मी तुमनाकरता काय करू अशी तुमनी ईच्छा शे?”
37 त्या बोलणात, “जवय तु तुना वैभवशाली राज्यमा राजासनवर बसशी तवय एकले तुना उजवी बाजुले अनी एकले तुना डावी बाजुले बसाड अशी आमनी ईच्छा शे.”
38 येशुनी त्यासले सांगं, “तुम्हीन काय मांगी राहिनात हाईच तुमले समजी नही राहीनं. जो दुःखना प्याला मी पेवाव शे तो तुमले पिता ई का? जो मृत्युना बाप्तिस्मा मी लेणार शे तो तुमनाघाई लेवावणार काय?”
39 त्या बोलणात, “लेता ई.”
येशुनी त्यासले सांगं, “जो प्याला मी पेवाव शे तो तुम्हीन पिशात अनी जो बाप्तिस्मा मी लेणार शे तो तुम्हीन लेशात हाई खरं;
40 पण मना डावा अनी मना उजवा बाजुले बसाडानं, हाऊ अधिकार माले नही. हाई जागा त्यासनाच करता शे ज्यासनाकरता देवनी ती तयार करी ठेयल शे.”
41 याकोब अनी योहान यासनी येशुजोडे काय मांग हाई जवय बाकीना दहा शिष्यसले समजनं तवय त्यासले भलता राग वना.
42 येशुनी त्यासले बलाईसन सांगं, “गैरयहूदी ज्यासले अधिकारी मानतस, त्यासनाच त्यासनावर अधिकार चालस, अनी त्यासनाच मोठा लोके त्यासनावर राज्य करतस हाई तुमले माहित शे.
43 पण तुमनामा तसं नही, तर ज्याले तुमनामा महान व्हणं शे त्यानी पहिले सर्वासना सेवक व्हवाले पाहिजे.
44 अनी ज्याले तुमनामा पहिला व्हवानी ईच्छा शे त्यानी पहिले सर्वासना दास व्हवाले पाहिजे
45 कारण मनुष्यना पोऱ्या पण सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे.”
येशु आंधया बार्तीमयले बरा करस
(मत्तय २०:२९-३४; लूक १८:३५-४३)
46 नंतर त्या यरीहो शहरमा वनात, येशु, त्याना शिष्य अनी लोकसनी मोठी गर्दी, हाई यरीहोतीन बाहेर जाई राहींती तीच वाटवर तीमयाना पोऱ्या बार्तीमय हाऊ आंधया भिकारी बशेल व्हता.
47 तवय हाऊ नासरेथ गावना येशु शे, हाई ऐकीन तो वरडीन बोलना, “हे येशु, दावीदना पोऱ्या, मनावर दया कर!”
48 तवय त्याले बराच जणसनी धमकाडीन सांगं, गप्प ऱ्हाय. पण तो जास्तच वरडाले लागणा, “हे दावीदना पोऱ्या, मनावर दया कर!”
49 तवय येशुनी थांबीसन सांगं, “त्याले बलावा”
मंग त्यासनी आंधयाले बलाईन सांगं, “हिम्मत धर ऊठ, येशु तुले बलाई ऱ्हायना.”
50 तवय तो पांघरेल कपडा बाजुले फेकीसन, उडी मारीन ऊठना अनी लगेच येशुकडे वना.
51 येशुनी त्याले ईचारं, “मी तुनाकरता काय करू अशी तुनी ईच्छा शे?”
आंधया त्याले बोलना, “गुरजी, मनी ईच्छा शे माले परत दखता यावं.”
52 येशुनी त्याले सांगं, जा, “तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे.”
अस बोलताच त्याले दखावु लागनं अनी तो वाट धरीन येशुना मांगे चालु लागना.