6
येशुले नासरेथ गावमा नकारतस
(मत्तय १३:५३-५८; लूक ४:१६-३०)
मंग येशु तठेन निंघीसन आपला नासरेथ गावले परत वना, अनं त्यानामांगे त्याना शिष्य बी तठे वनात. तो जवय शब्बाथ दिनले सभास्थानमा शिकाडी राहिंता तवय तठला लोके त्यानं ऐकीन थक्क व्हईसन बोलनात की, ह्या सर्व गोष्टी ह्याले कोठेन मिळण्यात? ह्याले काय हाई बुध्दी देवामा येल शे? अनी हाऊ चमत्कार कशा करस? अनं जो सुतार शे, अनी मरीयाना पोऱ्या अनी याकोब, योसेफ, यहूदा, शिमोन, ह्यासना भाऊ तो हाऊच शे ना? त्यान्या बहिणी या आपलाबरोबर शेतस ना? म्हणीन त्यासनी त्याले नकार.
येशु त्यासले बोलना, जो संदेष्टा ऱ्हास, त्याले आपला घरमा, नातलगसमा अनं आपला गावमा मानपान भेटस नही पण दुसरा लोके त्यासना सन्मान करतस.
त्यानी तठे थोडाच आजारीसले हात ठेईन बरं करं, यानाशिवाय त्याले तठे कोणताच चमत्कार करता वना नही.
बारा प्रेषितसले प्रचारले धाडं
(मत्तय १०:५-१५; लूक ९:१-६)
त्यासनी येशुवर ईश्वास ठेया नही म्हणीन त्याले आश्चर्य वाटनं. तवय तो प्रचार करत गाव-गाव फिरना. मंग येशुनी बारा शिष्यसले बलाईसन त्यासले दुष्ट आत्मा काढाना अधिकार दिधा अनी दोन दोन जणसनी जोडी करीसन त्यासले धाडी दिधं अनी त्यानी त्यासले आज्ञा करी की, “प्रवासकरता काठी शिवाय काहीच लई जाऊ नका भाकर, झोळी अनं कमरबंदमा पैसा लई जाऊ नका. तरी पायमा जोडा घालीन चाला अनी संगे सदरा लेवु नका.” 10 आखो तो त्यासले बोलना, “ज्या घरमा तुमनं स्वागत करतीन त्याच घरमा गाव सोडा पावत ऱ्हावा. 11  अनी ज्या गावना लोके तुमना स्विकार करावं नही अनी तठला कोणीच तुमनं ऐकाऊत नही तवय तठेन निंघाना येळले तुमना पायनी धुळ तठेच झटकी टाका. कारण ती त्यासले चेतावणी राही.”
12 त्यासनी तठेन जाईसन लोकसले प्रचार करीसन सांगं, “पाप सोडा अनी देवकडे वळा.” 13  त्यासनी बराच दुष्ट आत्मा काढात अनी बराच आजारीसले तेल लाईन बरं करं.
बाप्तिस्मा करनारा योहाननी हत्या
(मत्तय १४:१-१२; लूक ९:७-९)
14  येशुबद्दल हेरोद राजानी ऐकं कारण त्यानं नाव गाजेल व्हतं अनी काही लोके अस म्हणी राहींतात, “बाप्तिस्मा करनारा योहान मरेल मातीन जिवत व्हयेल शे, म्हणीसन हाई चमत्कारनी शक्ती त्यानामा कार्य करी राहीनी.”
15 कोणी त्याले “एलिया” म्हणे तर कोणी म्हणेत संदेष्टा शे म्हणजेच “जुना संदेष्टासना मायक एक शे.”
16 पण हेरोद हाई ऐकीसन बोलना, “हाऊ बाप्तिस्मा करनारा योहान शे! ज्याना मी शिरच्छेद करा, तो हाऊ योहान जिवत व्हयेल शे!” 17  हेरोदनी माणसे धाडीसन योहानले पकडीन कैदखानामा ठेयेल व्हतं. कारण त्याना भाऊ फिलीप्प यानी बायको हेरोदीया हिनासंगे हेरोद राजानी लगीन करेल व्हतं. 18 अनी बाप्तिस्मा करनारा योहान हेरोदले सांगे, “तु तुना भाऊनी बायकोसंगे लगीन करं, हाई अयोग्य शे.”
19 यामुये हेरोदिया हाई योहानना व्देष करे, तीनी त्याले मारानी ईच्छा व्हती पण हेरोदमुये तिले काहीच करता वनं नही. 20 योहान हाऊ धार्मीक अनं पवित्र माणुस शे हाई हेरोदले माहित व्हतं म्हणीन तो त्याले घाबरे अनं त्यानं रक्षण करे. तो जे काही बोले ते ऐकीसन हेरोद गोंधळी जाये, पण तरी तो आनंदमा त्यानं ऐकी ले.
21 शेवट एक दिन हेरोदिया हिले तिनी संधी भेटनी, कारण त्या दिन हेरोदना जन्मदिन व्हता. त्यानी सरदार, प्रधान, अनं गालील प्रांतमाधला मोठा लोकसले जेवणनं निमंत्रण दिधं. 22 मंग हेरोदिया हिना पोरनी स्वतः मजार राजवाडामा जाईसन नाचगाणा करीसन हेरोदनासंगे जेवणले बसेल सर्वासले खूश करं, तवय राजा त्या पोरले बोलना, “तुले जे काही पाहिजे ते मनाकडे मांग म्हणजे मी ते तुले दिसु.” 23 तो वचन दिसन बोलना, “मी शपथ खाईसन सांगस की, मना अर्धा राज्य पावत जे काही तु मांगशी ते मी तुले दिसु!”
24 तवय ती पोरनी बाहेर जाईसन आपली मायले ईचारं, “मी काय मांगु?” तवय ती बोलनी, “बाप्तिस्मा करनारा योहाननं मुंडकं.”
25 मंग तिनी लगेच पयत जाईसन राजाले सांग, “बाप्तिस्मा करनारा योहाननं मुंडकं ताटमा ठेईसन मनाकरता आत्तेच लई या अशी मनी ईच्छा शे!”
26 तवय राजा भलताच नाराज व्हयना कारण त्यानी देयल शपथमुये अनी तठे जेवणले बशेल लोकसनामुये त्याले तिले नकार देता वना नही. 27 तवय राजानी लगेच शिपाईले कैदखानामा धाडीसन बाप्तिस्मा करनारा योहाननं मुंडकं लयानी आज्ञा करी. तवय त्यानी कैदखानामा जाईन त्यानं मुंडकं कापं, 28 अनी मुंडकं ताटमा ठेईसन त्या पोरले आणी दिधं अनी ती पोरनी ते आपली मायले दिधं. 29 जवय बाप्तिस्मा करनारा योहानना शिष्यसले हाई बातमी कळनी तवय त्यासनी त्याना प्रेत उचलीसन कबरमा ठेवं.
पाच हजार लोकसले जेवण
(मत्तय १४:१३-२१; लूक ९:१०-१७; योहान ६:१-१४)
30 त्यानंतर प्रेषित येशुले परत ईसन भेटनात अनं त्यासनी जे काही करेल व्हतं अनी शिकाडेल व्हतं ते सर्वकाही त्यासनी त्याले सांगं. 31 तठे भरपुर लोके ये जा करी राहींतात त्यामुये येशुले अनी त्याना शिष्यसले जेवाले सवड भेटी नही राहींती. तवय तो त्यासले बोलना, “थोडा आराम कराले एकांतमा चला.” 32 मंग त्या नावमा बशीन एकांतमा निंघी गयात.
33 तवय लोकसनी त्यासले दखी लिधं बराच जणसनी त्यासले वळखी लिधं अनी तठला गावमधला लोके पायी चालीसन अनं पयत जाईसन येशु अनी त्याना शिष्यसना पहिलेच तठे पोहची गयात. 34  येशु नावमातीन उतरना तवय त्यानी लोकसनी गर्दी दखी, तवय त्याले त्यासनी किव वनी कारण त्या बिगर मेंढपाळना भटकेल मेंढरंसना मायक व्हई जायेल व्हतात. म्हणीन तो त्यासले बराच गोष्टी शिकाडु लागना. 35 जवय बराच उशीर व्हयना तवय, शिष्य येशुकडे ईसन बोलनात, “हाई एकांतनी जागा शे, अनी बराच उशीर व्हयेल शे. 36 म्हणीन त्यासले जाऊ द्या म्हणजे लोके आसपासना खेडापाडा अनं गावमा जाईसन स्वतःकरता जेवण ईकत लेतीन.”
37 पण येशुनी शिष्यसले उत्तर दिधं, “तुम्हीनच त्यासले खावाले द्या,” तवय त्या बोलनात, “आम्हीन दोनशे चांदिना शिक्कासण्या* भाकरी ईकत लईसन त्यासले खावाले देऊत का?”
38 येशु त्यासले बोलना, “तुमना जोडे कितल्या भाकरी शेतस? जाईसन दखा,” त्या दखीसन बोलनात, “पाच भाकरी अनी दोन मासा शेतस.”
39 मंग येशुनी शिष्यसले सांगं अनी त्यासनी सर्व लोकसले हिरवा गवतवर पंगतमा बसाले लायं. 40 तवय त्या शंभर शंभर अनी पन्नास पन्नासन्या पंक्तीसमा बसनात. 41 तवय येशुनी त्या पाच भाकरी अनी दोन मासा लिसन त्यावर स्वर्गकडे दखीसन आशिर्वाद मांगा, अनी भाकरी मोडीसन शिष्यना जोडे त्यासले वाढाले दिध्यात अनी त्यानी त्या दोन मासा बी सर्वासले वाढाले दिधात. 42 मंग सर्व लोकसनी पोटभर जेवण करं. 43 अनी शिष्यसनी उरेल मासान्या अनं भाकरीसना बारा डालक्या भरीन उचल्यात. 44 तठे जेवण खाणारा माणसेच फक्त पाच हजार व्हतात.
येशु पाणीवर चालस
(मत्तय १४:२२-३३; योहान ६:१५-२१)
45 मंग येशुनी शिष्यसले सांगं, “तुम्हीन नावमा बशीन समुद्रपलीकडला बेथसैदा गावमा जा, मी लोकसले सोडीसन येस.” 46 मंग तो लोकसले निरोप दिसन डोंगरवर प्रार्थना कराले गया. 47 अनी संध्याकाय व्हयनी तवय येशु काठवर एकलाच व्हता अनी नाव समुद्रना मध्यभागी व्हती. 48 तवय त्या त्याले नावमा आवकाया करतांना दखाईनात, कारण वारा विरूध्द दिशाना व्हता; पहाटले तीन ते सव वाजाना दरम्यान तो समुद्रना पाणीवरतीन चालीन त्यासनाजोडे वना. अनी त्यासना पुढे जावाना त्याना ईचार व्हता, 49 पण त्या त्याले पाणीवरतीन चालतांना दखीसन घाबरी गयात अनी “हाई भूत शे!” अस समजीन त्या वरडाले लागना.
50 कारण त्या सर्व त्याले दखीसन घाबरी जायेल व्हतात.
तवय येशु त्यासले बोलना, “धीर धरा, भिऊ नका, मी शे!” 51 मंग तो त्यासनाजोडे नावमा गया, अनी वारा शांत व्हयना, तवय त्यासले आश्चर्य वाटनं. 52 कारण त्या पाच हजार लोकसले जेवण खावाडानी गोष्ट त्यासले समजेल नव्हती कारण त्यासनं मन कठोर व्हयेल व्हतं.
येशु गनेसरेत गावना आजारीसले बरं करस
(मत्तय १४:३४-३६)
53 त्या समुद्रपलीकडला गनेसरेत प्रांतमा किनारावर पोहचनात अनी तठे त्यासनी नाव बांधीसन ठेई. 54 त्या नावमातीन उतरताच येशुले लोकसनी वळखं. 55 अनी त्या आसपासना परीसरमा जठे कोठे माहीत पडनं, तो शे, तठे तठे त्या आजारी लोकसले खाटवर उचलीसन पयत पयत लई जायेत. 56 तो गाव, शहर, खेडापाडामा जठे कोठे जाये तठे लोके आजारीसले बजारमा लई जाईन ठि देत अनी तुना कपडाले हात लावु दे असा त्या त्याले ईनंती करेत अनी जितलासनी त्याले हात लाया तितला बरा व्हई गयात.
6:4 ६:४ योहान ४:४४ 6:11 ६:११ प्रेषित १३:५१ 6:11 ६:११ लूक १०:४-११ 6:13 ६:१३ याकोब ५:१४ 6:14 ६:१४ मत्तय १६:१४; मार्क ८:२८; लूक ९:१९ 6:17 ६:१७ लूक ३:१९,२० 6:34 ६:३४ मत्तय ९:३६ * 6:37 ६:३७ दोनशे चांदिना शिक्का म्हणजे दोनशे दिननी मजुरी