24
येशु मंदिरना विनाशबद्दल भविष्य करस
(मार्क १३:१,२; लूक २१:५,६)
मंग येशु मंदिरमातीन बाहेर निंघी राहींता तवय त्याना शिष्य त्याले मंदिरनी माडी दखाडासाठे त्यानाजोडे वनात. तवय येशु त्यासले बोलना, “हाई सर्व तुम्हीन दखी राहीनात ना. मी तुमले खरं सांगस की; असा आठे दगडवर दगड ऱ्हावाव नही; जो पाडता येवाव नही.”
दुःख अनी तरास
(मार्क १३:३-१३; लूक २१:१-१९)
येशु जैतुनना डोंगरवर बशेल व्हता तवय त्याना शिष्यसनी त्यानाकडे ईसन ईचारं, “ह्या गोष्टी कवय व्हतीन अनी तुमनं येवानं अनी ह्या युगना समाप्तीनं चिन्ह काय शे, हाई आमले सांगा.”
येशुनी त्यासले उत्तर दिधं, तुमले कोणी फसाडाले नको म्हणीन जपी ऱ्हा. कारण बराच लोके मनं नाव लिसन येतीन अनी मी ख्रिस्त शे अस म्हणतीन अनी बराच जणसले फसाडतीन. जवय तुम्हीन लढायासबद्दल ऐकशात अनी लढायासन्या अफवा ऐकशात तवय संभाळा घाबरू नका कारण अस व्हवानं आवश्यकच शे, पण तेवढामा शेवट व्हवाव नही. कारण राष्ट्रसवर राष्ट्र अनं राज्यसवर राज्य ऊठतीन अनी जागोजागी दुष्काळ पडी अनं भूकंप व्हतीन. पण हाई सर्व म्हणजे दुःखनी सुरवात शे.
तुमना हाल कराकरता त्या तुमले धरी देतीन अनं तुमले मारी टाकतीन अनी मना नावमुये सर्वा लोके तुमना तिरस्कार करतीन. 10 त्या येळले बराचजन अडखळतीन; त्या एकमेकसले धरी देतीन, अनं एकमेकसना व्देष करतीन; 11 बराच खोटा संदेष्टा व्हतीन अनी बराच जणसले फसाडतीन. 12 अनी अधर्म वाढामुये बराच लोकसनी प्रिती थंडी व्हई जाई. 13  पण ह्यामा शेवटपावत जो टिकी राही त्यानच तारण व्हई. 14 जगमाधला सर्व लोकसकरता साक्ष व्हवाले पाहिजे म्हणीन देवराज्यनी हाई सुवार्ता सर्व जगमा गाजाडतीन; तवय शेवट व्हई.
महासंकटना काळ
(मार्क १३:१४-२३; लूक २१:२१-२४)
15 “दानीएल संदेष्टाद्वारा सांगेल,* बठं काही उध्वस्त करणारी अमंगळताले पवित्रस्थानमा उभा राहेल तुम्हीन दखशात.” 16 “तवय ज्या यहूदीया प्रांतमा व्हतीन त्यासनी डोंगरकडे पळी जावानं. 17  जो धाबावर व्हई त्यानी आपला घरमातील काही बी बाहेर काढाकरता खाल उतरानं नही. 18 अनी जो वावरमा राही त्यानी आपला कपडा लेवाकरता मांगे फिरीन येवानं नही. 19 त्या दिनसमा ज्यासले दिन राहतीन अनी ज्या लेकरंसले पाजणाऱ्या राहतीन त्यासना भयंकर हाल व्हतीन! 20 तरी हिवाळामा किंवा शब्बाथ दिनले तुमले पळनं पडाव नही म्हणीन प्रार्थना करा! 21  कारण जगना उत्पत्तिपाईन ते आजपावत वनं नही अनं येवाव नही, अस मोठं संकट त्या काळमा ई. 22 अनी देव त्या दिनसले थोडा नही करता तर; कोणताच माणुसना निभाव लागता नही, पण ज्यासले निवडेल शे त्यासनाकरता त्या दिन थोडा कराई जातीन.”
23 त्या येळले कोणी तुमले म्हणी, “दखा, ख्रिस्त आठे शे! किंवा तठे शे!” तर खरं मानु नका. 24 कारण खोटा ख्रिस्त अनी खोटा संदेष्टा व्हतीन; त्या असा मोठा चिन्ह अनं चमत्कार दखाडतीन की ज्यासले देवनी निवडेल शे त्यासले सुध्दा फसाडतीन. 25 दखा! मी हाई पहिलेच तुमले सांगीन ठेयेल शे.
26  “किंवा, जर कोणी तुमले म्हणी, ‘दखा, तो जंगलमा शे!’ तर तठे जावु नका; अनी कोणी म्हणी, ‘दखा, तो मझारनी खोलीमा शे!’ तर खरं मानु नका. 27 कारण जशी ईज पुर्व दिशाकडतीन निंघीन पश्चिम दिशापावत चमकस तसं मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई.”
28  जठे प्रेत शे, तठे गिधाड जमतीन.
मनुष्यना पोऱ्या येशु यानं परत येणं
(मार्क १३:२४-२७; लूक २१:२५-२८)
29  “त्या दिनसमाधला संकटना मांगतीन लगेच सुर्य अंधकारमय व्हई, चंद्र प्रकाश देवाव नही, तारा आकाशमातीन नष्ट व्हतीन अनी आकाशमाधली शक्ती हाली जाई. 30  तवय मनुष्यना पोऱ्यानं चिन्ह आकाशमा दखाई; अनी पृथ्वीवरला सर्व जातना लोके शोक करतीन त्या मनुष्यना पोऱ्याले आकाशना ढगसवर बशीसन, पराक्रमतीन अनी मोठा वैभवतीन येतांना दखतीन. 31 तुतारीसना महानादनासंगे, मी मना दूतसले धाडसु, अनी त्या पृथ्वीना एक टोकपाईन दुसरा टोकपावत मना निवडेल लोकसले चाऱ्ही दिशाकडतीन गोया करसु.”
अंजिरनं झाडना दृष्टांत
(मार्क १३:२८-३१; लूक २१:२९-३३)
32 “आते अंजिरना झाडना दृष्टांत ल्या, त्याले कवळी फांदी ईसन पानटा फुटू लागणात म्हणजे उन्हाळा जोडे येल शे अस तुमले समजस. 33 जवय तुम्हीन ह्या सर्व गोष्टी दखशात, तवय मी दारजोडे शे, अस समजा. 34 मी तुमले सत्य सांगस, जोपावत हाई सर्व पुरं व्हत नही तोपावत हाई पिढीना अंत व्हवाव नही. 35 आकाश अनी पृथ्वी पुसाई जाई, पण मनं वचन पुसावणारच नही.”
कोणलेच तो दिन अनी येळ माहीत नही
(मार्क १३:३२-३७; लूक १७:२६-३०,३४-३६)
36 “त्या दिनबद्दल अनी त्या येळबद्दल कोणलेच माहीत नही, स्वर्ग माधला देवदूतसले नही, देवना पोऱ्यालेसुध्दा नही; फक्त देवबापलेच माहीत शे. 37 नोहाना दिनसनामायक मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. 38 तवय जस जलप्रलय येवाना पहीलेना दिनसमा नोहा जहाजमा जास नही तोपावत लोके खाई पी राहींतात, लगीन करी ली राहींतात, लगीन करी दी राहींतात; 39 तवय जलप्रलय ईसन त्यासले वाहीन लई गया तोपावत त्यासले समजनं नही, तसच मनुष्यना पोऱ्यानं येणं व्हई. 40 त्या येळले वावरमा काम करनारा दोन जणसमातीन; एक उचलाई जाई अनी एक तठेच ठेवाई जाई. 41 जातावर दळनाऱ्या दोन बायासपैकी एक उचलाई जाई अनं एक तठेच ठेवाई जाई. 42 यामुये, जागृत ऱ्हा, कारण कोणता दिनले तुमना प्रभु ई हाई तुमले माहीत नही. 43  आखो, हाई समजी ल्या की, कोणता येळले चोर येवाव शे हाई जर घरमालकले माहीत ऱ्हातं, तर तो जागा ऱ्हाता अनी आपलं घर चोरले फोडु नही देता. 44 यामुये तुम्हीन तयार ऱ्हा, तुमले वाटाव नही त्या येळले मनुष्यना पोऱ्या ई.”
ईश्वासु किंवा अईश्वासु दास
(लूक १२:४१-४८)
45 असा ईश्वासु अनं ईचारशील कारभारी कोण शे? ज्याले त्याना मालक आपला सेवकसवर अधिकारी नेमी यानाकरता की, तो त्यासले येळवर जेवण दी. 46 मालक ई तवय जो दास तसं करतांना त्याले दखाई, तो दास धन्य! 47 मी तुमले सत्य सांगस की, मालक त्या दासले आपली सर्व मालमत्तावर अधिकारी नेमी. 48 पण जर तो दुष्ट दास व्हई तर तो आपला मनमा म्हणी, मना मालकले येवाले आखो बराच येळ लागी. 49 अनी तो आपला सोबतना दाससले मारू लागना अनं दारूड्याससंगे खाऊ पिऊ लागना, 50 तवय दास मालकनी वाट दखत नही त्या दिनले अनी त्याले माहीत नही त्या येळले त्याना मालक ईसन, 51 त्या दासले कापी टाकी अनी ढोंगीसनासंगे त्याले टाकी दी. तठे रडनं अनी दात खानं चाली
24:9 २४:९ मत्तय १०:२२ 24:13 २४:१३ मत्तय १०:२२ * 24:15 २४:१५ वाचनारानी हाई ध्यानमा लेवानं की, ह्याना अर्थ काय शे! 24:17 २४:१७ लूक १७:३१ 24:21 २४:२१ प्रकटीकरण ७:१४ 24:26 २४:२६ लूक १७:२३,२४ 24:28 २४:२८ लूक १७:३७ 24:29 २४:२९ प्रकटीकरण ६:१२; प्रकटीकरण ६:१३ 24:30 २४:३० प्रकटीकरण १:७ 24:43 २४:४३ लूक १२:३९,४०