मीखा
लेखक
मीखा नावाच्या पुस्तकाचा लेखक, संदेष्टा मीखा होता (मीखा 1:1). मीखा एक ग्रामीण संदेष्टा होता ज्याला शहराच्या केंद्राकडे सामाजिक व आध्यात्मिक अन्याय आणि मूर्तीपूजेच्या परिणामी देवाकडून येणाऱ्या न्यायदंडाचा संदेश आणण्यास पाठविण्यात आले होते. देशाच्या मुख्यत्वे कृषी भागामध्ये राहणे, मीखा हा आपल्या राष्ट्रातील शासकीय केंद्राबाहेर वास्तव्य करत होता, ज्यामुळे लंगडे, बहिष्कृत आणि दुःखी लोक, समाजातील कमकुवत व कमी भाग्यवान लोकांसाठी त्यांच्या भक्कम चिंतेत होते (मीखा 4:6) मीखाचे पुस्तक सर्व जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सर्वात महत्त्वाच्या भविष्यवाण्यांपैकी एक प्रदान करते, ज्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म होण्यापूर्वी सातशे वर्षांपूर्वी, बेथलहेम आणि त्याच्या शाश्वत स्वभावाचे जन्मस्थान दर्शविले गेले होते (मीखा 5:2).
तारीख आणि लिखित स्थान
साधारण इ. पू. 730 - 650.
मीखाचा सुरुवातीचा शब्द उत्तरेकडील इस्त्राएल राष्ट्राचे पतन होण्याआधी दिसतो (1:2-7). मीखाचे इतर भाग बाबेलच्या बंदिवासात लिहिण्यात येतात आणि नंतर काही बंदिवानांना घरी परत यावे म्हणून दिसत आहेत.
प्राप्तकर्ता
मीखाने दोन्ही इस्त्राएलचे उत्तरेकडील राज्य आणि यहूदाचे दक्षिणेकडील राज्य याबद्दल लिहिले.
हेतू
मीखाचे पुस्तक जवळजवळ दोन महत्त्वपूर्ण भविष्यवाण्यांकडे फिरते: एक इस्त्राएल आणि यहूदा (1:1-3:12) वरील न्याय, दुसरे, हजार वर्षांमधील देवाच्या राज्यातील लोकांचे पुनर्वसन (4:1-5:15). देव लोकांना त्यांच्या चांगल्या कृत्यांबद्दल स्मरण करून देतो, त्याने कशी त्यांची काळजी घेतली ज्यावेळी त्यांनी त्यांचीच काळजी केली.
विषय
दैवी न्याय
रूपरेषा
1. देव न्यायामध्ये येत आहे — 1:1-2:13
2. विनाशाचा संदेश — 3:1-5:15
3. निंदेचा संदेश — 6:1-7:10
4. उपसर्ग — 7:11-20
1
शोमरोन व यरूशलेमसाठी शोक
1 परमेश्वराचे वचन जे मीखा मोरेष्टी याजकडे, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या दिवसात त्याच्याकडे आले, जे वचन शोमरोन व यरूशलेम यांच्याविषयी होते, ते असे.
2 सर्व लोकांनो ऐका,
पृथ्वी व ते सर्व जे तुझ्यात आहेत, तुम्ही ऐका!
प्रभू परमेश्वर, त्याच्या पवित्र मंदिरातून तुमच्याविरुध्द साक्षीदार होवो.
3 पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे.
तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.
4 विस्तवाजवळ ठेवल्यास मेण वितळते,
तसे त्याच्या पायाखाली पर्वत वितळतील,
दऱ्या दुभंगतील,
आणि उंच टेकड्यावरून वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे ते वाहू लागतील.
5 ह्याला सर्वांचे कारण याकोबचे पाप,
तसेच इस्राएलाच्या घराण्याची दुष्कर्मे आहेत.
याकोबाच्या बंड खोरीचे कारण काय?
त्यास कारणीभूत शोमरोनच आहे की नाही?
यहूदाची उंचस्थाने कोणती आहेत?
ती यरूशलेमच आहेत की नाही?
6 “म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन,
ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.”
मी तिचे दगड दरीत ढकलून देईन,
आणि तिचे पाये उघडे करीन.
7 तिच्या सर्व मूर्तीं ठेचून तुकडे तुकडे केले जातील.
तिच्या कोरीव मूर्ती आगीमध्ये भस्मसात केल्या जातील.
तिच्या सर्व खोट्या दैवतांच्या मूर्तींचा मी नाश करीन,
कारण तिने वेश्येच्या कमाईने त्या मिळवल्या आहेत,
म्हणून वेश्येच्या वेतनास त्या परत जातील.
8 या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन.
मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन.
मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन
आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.
9 कारण तिच्या जखमा बऱ्या न होणाऱ्या आहेत.
कारण त्या यहूदापर्यंत आल्या आहेत,
आणि तो माझ्या मनुष्यांच्या वेशीपर्यंत, यरूशलेमपर्यंत पोहोचला आहे.
10 गथमध्ये हे सांगू नका; अजिबात रडू नका.
बेथ-ले-अफ्रामध्ये मी धुळीत लोळलो.
11 शाफीरमध्ये राहणारे लोकहो,
तुम्ही नग्न आणि लज्जित होऊन निघून जा.
सनानिवासी बाहेर निघून येत नाही,
बेथ-एसलासचा शोक करेल,
कारण त्यांचे संरक्षण काढून घेण्यात आले आहे.
12 मारोथमधील लोक उत्सुकतेने चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत,
कारण परमेश्वराकडून संकट खाली यरूशलेमेच्या वेशीपर्यंत आले आहे.
13 लाखीशात राहणारे, रथाला चपळ घोडा जुंप,
लाखीश, तूच, सियोनेच्या कन्येला पापाची सुरूवात अशी होती.
कारण इस्राएलाचे अपराध तुझ्यांत सापडले होते.
14 म्हणून तू गथांतल्या मोरेश-गथला निरोपाचे नजराणे देशील;
अकजीबची घरे इस्राएलाच्या राजाला निराश करतील.
15 मारेशामध्ये राहणाऱ्या लोकांनो,
मी तुझा वारीस तुझ्याकडे आणीन,
जे तुमचा ताबा घेतील.
इस्राएलचे पुढारी अदुल्लामला येतील.
16 म्हणून तू आपले केस काप व मुंडन कर.
कारण तुम्हास प्रिय असलेल्या मुलांसाठी तुम्ही शोक कराल.
गरुडा प्रमाणे तुम्ही स्वत:च्या डोक्याचे मुंडन करा.
कारण तुमच्या मुलांना तुमच्यापासून दूर नेले जाईल.